Description
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी ही आहे. तिच्या अनेक उपभाषा आहेत. प्रादेशिक रचनेनुसार वऱ्हादी, कोकणी, अहिराणी भाषेचा वेगळा बाज आढळतो. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठीची धाटणी वेगळी आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहिराणी तर मराठी, गुजराती, राजस्थानी, हिंदी भाषेचे संयुक्त मिश्रण आहे. त्या अंगाने कोकणा, भिलोरी, पावरी या आदिवासी बोलीभाषांमध्ये अनेक भाषांमधून शब्द आले आहेत.
महाराष्ट्रातील नाशिक, ठाणे, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील आणि गुजरातेत डांग, नवसारी, धरमपुर, सुरत या जिल्ह्यांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आपापले विषय या पुस्तकात मांडले आहेत. त्यात प्रामुख्याने कोकणा, भिल्ल, कोळी या आदिवासी जमातीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. आकर्षक मुखपृष्ठ आणि अंतर्मुख करणारे (ब्लर्ब) वाचले की, हे पुस्तक संग्रही ठेवण्याचा मोह होईल. प्रत्येकाने संग्रही ठेवावे अथवा इतरांना भेट द्यावे ऐसे पुस्तक म्हणून या पुस्तकाची ओळख होईल.
Reviews
There are no reviews yet.