Description
तणावात, चिंतेत किंवा अस्वस्थ असल्यावर, मार्ग सुचत नसेल, निर्णय घेता येत नसेल, मनात गोंधळ असेल तर झेन कथा एखादी लहानशीच पण लख्ख मर्मदृष्टी देऊ शकतात. असा मार्ग दाखवू शकतात, जो अंत:प्रेरणेने चिंता व तनावमुक्त करू शकतो. या कथा ‘ हाऊ टू…’ सारख्या महितीपर मार्गदर्शन करणाऱ्या नाहीत, तर आतूनच उजळत नेणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या ज्ञानासारख्या आहेत. या कथा आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या कोलाहलात, जीवघेण्या, रणरणत्या प्रवासात विसाव्याला येणाऱ्या झाडाच्या दाट सावलीसारख्या आहेत. बसावं, शांत व्हावं, ऊर्जा प्राप्त करावी आणि पुढची वाटचाल जोमाने सुरू करावी. व्यक्तिमत्व विकासासाठी एक वेगळा अर्थपूर्ण आयाम देण्याची क्षमता या कथांमध्ये आहे.
मनुष्य जीवन आनंदी जगण्यासाठी आहे, ऊर फूटेस्तोवर धावण्यासाठी नाही. जगण्यातला आनद नक्की कशात आहे, तो शोधण्याची सम्यक दृष्टी या कथांत आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदमय कसा करता येईल, ते या कथा सांगतात. ‘आतला’ आवाज ऐकण्याची प्रेरणा देणाऱ्या या कथांमध्ये शेकडो पिढ्यांचा सजग, सम्यक ज्ञानाचा संचय झालेला आहे. जो हरक्षणी पथदर्शक म्हणून उपलब्ध आहे. अंधारलेला रस्ता उजळण्यासाठी हाती घेतलेल्या दिव्यासारखा या कथा आहेत. बुद्धाच्या उपदेशाचे सार या कथांमध्ये आहे, ते म्हणजे – अत्त दिप भव.
Reviews
There are no reviews yet.