Description
सुमारे ४० वर्षांपूर्वी मी युरोप, अमेरिकेमध्ये असताना पॅरिस,लंडन, न्यूयार्क, शिकॅगो, वॊशिंग्टन इत्यादी ठिकाणची प्रसिद्ध म्युझियम्स निरखून पाहिली. त्यासंबंधी लेखही मनोहर मासिकात लिहून प्रसिद्ध केले. वाचकांना ते फार आवडले. म्हणून ‘रंग आणि रेखा’ या पुस्तकात ते सचित्र प्रसिद्ध केले.
प्रसिद्ध कलाकृतींचे निरीक्षण केले;पण या कलाकृती निर्माण करणारे कलावंत कोण होते? त्यांची तपश्चर्या कोणती होती? त्यांना अडचणी कोणत्या आल्या यासंबंधी मला कोणतीच माहिती नव्हती. लिओनार्डो व्हिन्वि, राफेल,मायकेलांजेलो, व्हॅन गॉघ, रेम्ब्रॉट, पिकासो, रवींद्रनाथ ठाकूर, राजा रविवर्मा इत्यादींच्या चरित्रांचा मी अभ्यास केला. चित्रकलेची मुळातच आवड असल्याकारणाने मी त्यांचे कलाविश्व समजावून घेतले व ‘वसंत’ आणि ‘नवे जग’ या मासिकांतून या चित्रकारांच्या चरित्रकथा लिहून प्रसिद्ध केल्या. मराठीत अशा प्रकारचे लेखन प्रथमच प्रसिद्ध होत होते. लोकांना त्या कथा आवडल्या.
यापुढच्या कालात अशा प्रकारच्या चरित्रकथा फारशा प्रसिद्ध झाल्या नाहीत. म्हणून मी ‘थोर चित्रकार’ या नावाचा नवा संच वाचकांच्या हाती देत आहे. वाचकांना हा संच आवडेल अशी आशा आहे. कर्मवीर प्रकाशन, पुणे यांनी हि पुस्तके प्रसिद्ध केली याचा आनंद वाटतो. त्यांच्या साहाय्याने आणखी काही योजना मी हाती घेत आहे. त्याही सिद्धीस जातील अशी अपेक्षा आहे.
Reviews
There are no reviews yet.