कथा चाणक्य

199.00

1 in stock

पुस्तकाचे नाव कथा चाणक्य
लेखक राधाकृष्णन पिल्लई
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १७०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम
Category:

Description

राजा की ऋषी ?
राजा की राजा घडविणारा ? 
मनुष्य की दंतकथा ? 

सम्राट चंद्रगुप्ताचे गुरु चाणक्य यांचे जीवन जितक्या चातुर्यकथांनी भरलेले आहे, तितकेच त्यांच्याभोवती गूढवलय आहे. त्यांचे शब्द आणि कृती काटेकोरपणे आखली जाई आणि त्याची अंमलबजावणी केली जाई. जीवनातील महत्वाचे घडे चाणक्यांनी गोष्टीरूपाने सांगितले आहेत आणि प्रसिद्ध लेखक राधाकृष्णन पिल्लई यांनी या सुंदर पुस्तकात नेमके हेच केले आहे.

कथा चाणक्य या पुस्तकात महान आचार्यांच्या जीवनातील गोष्टी सांगितल्या आहेत.  तसेच भारताच्या या सर्वोत्तम रणनीतीज्ञ व विचारवंत असलेल्या व्यक्तीच्या धोरणांना व व्यवहारांना येथे आधुनिक काळाचा संदर्भ दिलेला आहे. यांतील काही गोष्टी खऱ्या आहेत आणि काही काल्पनिक. परंतु या सर्व कथांचा केंद्रबिंदू जनतेचा उत्कर्ष हाच आहे – मग तो नवीन नेता निवडण्याच्या दोलायमान स्थितीचा असो, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रश्न असो की बलवान शत्रूला नेस्तनाबूत करण्याबाबत असो.

जर तुमच्यापाशी दूरदृष्टी असेल, तुमचे एखादे स्वप्न असेल; तर ‘कथा चाणक्य’ ते तुम्हाला सत्यात उतरवण्यासाठी मदत करील. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कथा चाणक्य”

Your email address will not be published. Required fields are marked *