Description
प्रेम, करुणा आणि प्रज्ञा हा संदेश बुद्धाने दिला. प्रत्येक माणसाला समजून घ्या. त्याच्यावर प्रेम करा. त्याचे दु:ख दूर होईल अशी करुणा त्याला दया व सर्वत्र ज्ञान हीच जागृती आहे, असे समजले तर समाजात सौहार्दाचे नाते निर्माण होऊ शकते हा जो व्यापक तत्त्वविचार बुद्धाच्या शिकवणुकीतून आला आहे, त्याचा प्रभाव आयु. मधुकर झनकर यांच्या प्रत्येक कथेवर आहे. म्हणूनच या कथा प्रभावी व वाचनीय जाल्या आहेत. प्रत्येक कथेचे म्हणून एक स्वतंत्र स्थान आहे. वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध घेऊन प्रत्येक कथा अविष्कृत झाली आहे. आयु. मधुकर झनकर यांची प्रत्येक कथा वाचताना त्याचे चिंतन लक्षात येते. त्यांची कल्पनाशक्ती आणि तरल संवेदनक्षमता त्यातून प्रकट होते. माणसाच्या मनाचा वेध घेण्याची त्यांची शैली म्हणूनच उल्लेखनीय आहे.
आयु. मधुकर झनकर यांच्या ह्या कथा वाचताना एक महत्त्वाची बाब लक्षात येते, ती ही की लेखकाने बौद्ध वाङ्मयाचा सखोल अभ्यास केला आहे. बौद्धकालीन समाजजीवन व सांस्कृतिक वातावरण याचे भान \ ठेऊन त्यांनी कथालेखन केलेले आहे. बौद्ध विचारांचा प्रभाव त्यांच्या कथा लेखनावर आहेच, शिवाय स्त्रियांकडे पाहण्याची त्यांची निर्लेप दृष्टीही त्यातून व्यक्त होते. स्त्रियांच्या व्यथांची, मनोबलाची अवस्था लेखकाने कुशलतेने टिपली आहे. बौद्ध-साहित्यात या कथांना अनन्य साधारण महत्त्व आहे.
Reviews
There are no reviews yet.