Description
शैव विवाहाची संकल्पना प्रारंभी ज्या हृद्य अपेक्षा निर्माण करते, त्या अपेक्षा ती पूर्ण मात्र करू शकत नाही. वर्णभेद नाकारण्याच्या भूमिकेमुळे या संकल्पनेविषयी प्रचंड आदर वाटू लागतो, पण त्या भूमिकेच्या मर्यादा पाहिल्या, कि अपेक्षाभंगाने मन खिन्न, विषन्न, उदास होते. शैव विवाह स्त्रीपुरुषांनी परस्परसंमतीने करायचा म्हटल्यावर स्त्रीपुरुषसंबंधातील समतेच्या नात्यामुळे मन आनंदाने उत्कंठित होते, पण प्रत्यक्षात तो केवळ तात्पुरता मामला आहे, त्यामध्ये उत्कट प्रीतीचा हळुवारपणा वा कोवळीक नाही, हे पाहिल्यावर प्रेम या संकल्पनेच्या लावण्याला आणि माधुर्याला कलुषित केल्याची वेदना वाट्याला येते.
Reviews
There are no reviews yet.