Description
”धर्मशास्त्राचा त्रोटक इतिहास व्यवहारप्रमुखाच्या आरंभी जोडला तर तो धर्मशास्त्राचे अध्ययन करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. माझे धर्मशास्त्राचे चिंतन जसजसे वाढत गेले तसतसे मला असे आढळून आले की ह्या विषयावरील माहिती लहानशा प्रस्तावनेमध्ये समाविष्ट केल्याने त्या विषयाच्या समृद्धत्त्वाची आणि प्राचीनकाळाची समाजरचना, तुलनात्मक न्यायदानपद्धती आणि द्न्यानांच्या इतर शाखा ह्याच्या दृष्टीने धर्मशास्त्राच्या इतिहासाचे महत्त्व ह्यांची पुरेशी कल्पना येणार नाही. शेवटी मी धर्मशास्त्राचा इतिहास पूर्णपणे स्वतंत्र रीतीने प्रसिद्द करण्याच्या निश्र्चय मनात ठरविला.”
पहिला उद्देश्य धर्मशास्त्रासंबंधी कालानुक्रम आणि अत्यंत प्राचीन काळापासून त्या शास्त्रामध्ये समाविष्ट होणाऱ्या निरनिराळ्या विषयांच्या बाबतीत घडलेल्या परिवर्तनाचा इतिहास हां दोन खंडांमध्ये समाविष्ट आहे.
धर्मशास्त्रात अंतर्भाव होणाऱ्या विवाह आणि इतर संस्कार, न्यायदान पद्धती आणि कायद्याची अंमलबजावणी, नित्यकर्म, व्रते, श्राद्ध, आणि अशीच ह्या विषयांचा वेदकालापासून आधुनिक कालापर्यंत कसकसा विकास झाला ह्यांचे वर्णन केले आहे.
Reviews
There are no reviews yet.