शोध मराठ्या शोध मराठा

18.00

Out of stock

पुस्तकाचे नाव शोध मराठ्या शोध मराठा
लेखक पुरुषोत्तम खेडेकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६८ ग्रॅम

Description

भारताला स्वातंत्र देताना इंग्लंडमधील तत्कालीन विरोधी पक्षनेते विरोधात होते. त्यांचे नाव सर विन्स्टन चर्चिल. चर्चिलचे म्हणणे होते, ”भारत स्वातंत्र झाला तरी तेथील जनतेला गुलामीची एवढी सवय झाली आहे की त्यांना स्वातंत्र्याचा अर्थच कळणार नाही. त्यामुळे फारतर भारतावरील मूळच्या गोऱ्या इंग्रजांचे राज्य संपेल. पण तेथील सामान्य जनतेवर काळे इंग्रज जास्त अन्याय करतील.” इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये सण १९४६ मध्ये झालेल्या या चर्चेचा आज भारत, महाराष्ट्र व मराठे अनुभव घेत आहेत. गोऱ्या इंग्रजांचे राज्य ‘महाराणी’ च्या रूपाने चालत असे. व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी देश ताब्यात घेऊन राजकीय सत्ता स्थापन केली. १८५८ ला राणीचा जाहीरनामा आला. त्यानंतरच्या व्हाईस रायने अनेक कायदे करून सामाजिक सुधारणा राबवल्या. गुन्हेगारी कायद्यामध्ये लिंग,धर्म,जात,प्रांत,भाषा असे विशेषाधिकार नाकारून कायद्यासमोर सर्व एक झाले. किमान या क्षेत्रात तरी एकवर्णवाद आला पण प्रत्यक्ष शासन व प्रशासन सामान्य शेतकरी, कष्टकरी,कुणब्यास पोषक नव्हते. म्हणून महात्मा जोतिबा फुलेंनी इंग्लंडच्या राजकुमारीची शेतकरी वेशात भेट घेऊन समाजाची कैफियत मंडळी होती. त्यावेळी महात्मा जोतिबा फुले म्हणाले होते.
सत्ता तुझी राणीबाई । डोळे उघडोनि पाही ।।
जिकडे तिकडे ब्राम्हणशाही । कुणब्याची दाद नाही ।।
आज दीडशे वर्षानंतर ‘राणीबाई’ ची जागा ‘सोनियाबाईंनी’ घेतली आहे. इतर दुरव्यस्था चर्चिलने भाकीत केल्याप्रमाणेच आहे. भारतात सुमारे सहा टक्के व राज्यात सुमारे पन्नास टक्के असलेल्या ‘मराठ्यांनो’ हे मे-२०११ मधील ‘मराठाचित्रण’ आहे. लोकशाही व्यवस्थेतून तुम्हाला आपला विकासाचा वाटा मिळवायचा आहे. राजसत्ता म्हणजे केवळ राजकारण व सर्वसत्ता नाही. आम्हाला पुढाऱ्याची-स्टेटसमनची जास्त गरज आहे. अद्ययावत राहणी व अद्ययावत विचारांची गरज आहे. ते स्वतःचे स्वतःच करावे लागेल. तेव्हा काय चालले आहे, ते समजण्यासाठी आतातरी … ‘शोध मराठ्या-शोध मराठा.’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शोध मराठ्या शोध मराठा”

Your email address will not be published. Required fields are marked *