Description
रा. ना. चव्हाण हे विसाव्या शतकातील सत्यशोधक चळवळीतील एकनिष्ठ कार्यकर्ते होते. महात्मा जोतीराव फुले यांनी ज्या बहुजनवर्ग विकासाचा ध्यास घेतला होता, त्या विचार कृतीचे रा. ना. चव्हाण सच्चे पाईक होते. त्यांनी हयातभर जपलेल्या ध्यासातून त्यांच्या हाती सत्यशोधक चळवळीची जी अस्सल कागदपत्रे आली, त्यांचा संग्रह रा. ना. चव्हाण यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी ‘ सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ ग्रंथरूपाने आपल्यापुढे सादर केला आहे. ऐतिहासिक साधने – संदर्भ नवी वा जुनी नसतात, ती मृत्युंजयी असतात. अशा साधनांमुळे इतिहास न पुसली जाणारी रेष बनत असते. अशी अमर्त्य साधने कालौघात पूर्वरेषा आखूड करीत नवसंशोधन विस्तारत इतिहासावर नवा प्रकाशझोत टाकत असतात. इतिहासाचे पुनर्लेखन व पुनर्मूल्यांकन शक्य होते, ते अशा साधनसंग्रहाच्या संपादन, प्रकाशनामुळेच. रमेश चव्हाण सन 1994 पासून अव्याहत संदर्भ स्त्रोतांचा प्रवाह वाहता ठेवत एक प्रकारे आपल्या पित्याची स्मृती कृतिशील वारशातून जपत, जोपासत आहेत. नव्या पिढीसाठी ही साधने नवा इतिहास रचण्यास साहाय्यभूत ठरतील असा मला विश्वास वाटतो, म्हणून हा ग्रंथ सर्वांकडे असायला हवा.
Reviews
There are no reviews yet.