मध्ययुगीन भारत एका संस्कृतीचा अभ्यास

180.00

Out of stock

पुस्तकाचे नाव मध्ययुगीन भारत एका संस्कृतीचा अभ्यास
लेखक इरफ़ान हबीब
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २६३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २८५ ग्रॅम

Description

इसवी सन 600 ते 1750 हा प्राचीन भारत आणि वसाहतपूर्ण कालीन भारत यांना जोडणारा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा कालखंड, भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाच्या प्रवाहाला निर्णायक वळण या मध्ययुगीन कालखंडातय लाभले. अनेक छोट्या – छोट्या राज्यांची उपस्थिति, वाढते शहरीकरण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास, तत्त्वज्ञान, साहित्य आणि कला क्षेत्रांतील भरीव कामगिरी आणि भारतीय उपखंडाचे एकत्रीकरण हे सर्व याच कालखंडाने पाहिले, प्राथमिक  ऐतिहासिक साधने, पुरातत्त्वीय संदर्भ, ऐतिहासिक कथानके आणि देशी – परदेशी प्रवाश्यांनी लिहिलेले वृत्तांत व यूरोपियन व्यापारी दस्तावेज यांच्यावर आधारित भारताच्या मध्ययुगीन इतिहासावरील हा एक महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ सिद्ध होईल.

इरफ़ान हबीब ( जन्म 1931) हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा मार्क्सवादी दृष्टीकोनातून अभ्यास करणारे एक मननीय अभ्यासक, ऐतिहासिक भूगोल, वसाहतीकरणाचा भारतावरील परिणाम ते भारताच्या प्रशासकीय आणि आर्थिक इतिहासापर्यंत त्यांच्या संशोधनाची व्याप्ती आपणाला दाखवता येईल, त्यांच्या काही अत्यंत गाजलेल्या पुस्तकांत द अग्रेरियन सिस्टीम ऑफ़ मुघल इंडिया 1556-1707, अंन अटलास ऑफ मुघल एम्पायर यांचा समावेश आहे.  ते 1969 ते 1991 या काळात अलीगढ मुस्लिम विद्यापीठ येथे इतिहासाचे प्राध्यापक होते आणि 2007 मध्ये सुप्रतिष्ठित प्राध्यापक (Emeritus Professor) म्हणून ही त्याची निवड करण्यात आली. 2005 मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानित केले आहे. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मध्ययुगीन भारत एका संस्कृतीचा अभ्यास”

Your email address will not be published. Required fields are marked *