Description
- ‘रोहित डे यांचं हे पुस्तक वकिलांविषयी आणि न्यायाधीशांविषयी नाही, तसंच त्यांच्या विद्वत्तेची किंवा त्यांच्या युक्तिवादांमध्ये शेक्सपिअरच्या नाटकांतली अवतरणं कशी आली याचीही चर्चा त्यात नाही. भारतात संविधान लागू झाल्यानंतर काहीच दिवसांच्या आत आपल्या अधिकारांची मागणी करत न्यायालयात गेलेल्या सर्वसामान्य लोकांची गोष्ट सांगणारं हे पुस्तक आहे. संविधान १९५० साली लागू झालं, हे आपल्याला माहीत असतं, पण सर्वसामान्य लोकांनी ते कसं आत्मसात केलं, स्वतःच्या अधिकारांसाठी त्याचा वापर कसा केला, आणि राज्यसंस्थेला स्वतःच्या मर्यादा कशा दाखवून दिल्या, हे खूप कमी लोकांना माहीत असतं. रोहित यांच्या पुस्तकात ही प्रक्रिया उलगडून दाखवली आहे. खरंतर ही प्रक्रिया आजही सुरू आहे. पण संविधान लागू झालं, त्या काळातील सर्वसामान्य लोकांची सक्रियता पाहून काहीसं आश्चर्य वाटतं, लोकांना या संविधानाकडून आशा वाटत होती हे कळल्यावर बरं वाटतं आणि आजसुद्धा लोकांना संविधानाबाबत अशी आशा वाटते, याचं समाधानही वाटतं. ‘ –
– रवीश कुमार,
प्राइम टाइम विथ रवीश, एनडीटीव्ही, २३ नोव्हेंबर २०१८
रोहित डे यांचं हे पुस्तक संविधानाचा भारतीयांवरील प्रभाव अधोरेखित करणारं आहे. जनसामान्यांच्या जीवनात संविधानाने घडवलेले बदल आणि त्याचे परिणाम यांविषयी या पुस्तकात उदाहरणांनिशी केलेलं विवेचन आपल्या संविधानाचं सामर्थ्य उलगडून दाखवणारं आहे. पुस्तकाचे लेखक रोहित डे हे इतिहासाचे अभ्यासक. अमेरिकेतील येल विद्यापीठात अध्यापन करणारे रोहित डे दक्षिण आशियाच्या कायदेविषयक इतिहासावर वेळोवेळी अकादमिक शिस्तीने लिहीत असतात. भारतीय संविधानाची निर्मिती, त्याची अंमलबजावणी आणि भारतीयांनी केलेला त्याचा अंगीकार ही प्रक्रिया त्याच संशोधकीय वृत्तीने; परंतु रोचक शैलीत रोहित डे यांनी या पुस्तकात मांडली आहे.
– लोकसत्ता,
२३ जानेवारी २०२१
Reviews
There are no reviews yet.