Description
विश्वाचा चित्तवेधक इतिहास
काळाचा उदय होण्याच्या
आधीपासून ते सुदूर भविष्याच्या दूरवरच्या टोकापर्यंत
बहुतेक सगळे इतिहासकार काळाचे सर्वांत लहान-लहान तुकडे अभ्यासत जातात. ते करत असताना त्यांचा भर विशिष्ट तारखा, व्यक्ती आणि दस्तऐवजांवर असतो. मात्र बिग बँगपासून ते आजपर्यंत संपूर्ण इतिहासाचा आणि अगदी सुदूरच्या भविष्याचा अभ्यास करायचा झाला तर तो कसा असेल ? काळाच्या सबंध पटाकडे बघितल्याने आपला या विश्वाविषयीचा, पृथ्वीविषयीचा आणि चक्क आपल्या अस्तित्वाविषयीचा दृष्टिकोन कसा बदलेल ?
या प्रश्नांची उत्तरं शोधायला डेव्हिड ख्रिश्चन “बिग हिस्ट्री” कल्पनेचा माग काढत गेले. आपण कुठे होतो, कुठे आहोत आणि कुठे चाललो आहोत हे समजून घेण्याचा हा सर्वांत रोमांचक असा नवीन मार्ग आहे. आपल्या ओरिजिन स्टोरी या पुस्तकातून डेव्हिड ख्रिश्चन, ज्याला आपण ‘इतिहास’ म्हणून ओळखतो अशा संबंध १३.८ अब्ज वर्षांच्या विलक्षण प्रवासावर वाचकांना घेऊन जातात. या इतिहासाला आकार देणाऱ्या घटना (टप्पे), महत्त्वाचे कल आणि आपल्या मुळाविषयीचे गहन प्रश्न यांच्यावर लक्ष केंद्रित करून, सर्व चराचराला एकत्र बांधणारे अदृश्य धागे ख्रिश्चन दाखवून देतात. त्यात ग्रहाच्या निर्मितीपासून ते शेतीचं आगमन, अणुयुद्ध आणि त्यापलीकडच्या गोष्टींचा समावेश होतो.
विश्वाची उत्पत्ति, जीवसृष्टीची सुरुवात, मानवांचा उदय आणि भविष्यात दडलेल्या शक्यता यांविषयीचं चित्तथरारक अंतदर्शन घडवत ही ‘उत्पत्तिकथा’ आपली या विश्वातली जागा नवीन चौकटीत धिटाईने दाखवून देते.
“जगाविषयी आपल्याला जे काही ज्ञान आहे त्या सर्व ज्ञानाची संगती लावण्यासाठी इतिहासाचा वापर करण्याचा विलक्षण मार्ग डेव्हिड ख्रिश्चन यांना उत्पत्तिकथेत सापडला आहे. हे फार अद्भुत यश आहे.”
– कार्लो रोव्हेली,
सेव्हन ब्रीफ लेसन्स ऑन फिजिक्स आणि द ऑर्डर ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक
Reviews
There are no reviews yet.