Description
भीमावर आत्तापर्यंत बहुतेकांनी अन्यायच केला आहे असे वाटते. भीमाच्या अंतरंगातली खळबळ, त्याच्या भावना कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. भारतीय युद्धाच्या आधी भीमाने जो शांततावादाचा पुरस्कार केला त्यातून त्याची सदहृदयातच दिसून येते. ज्या लोकांनी त्याच्यावर निरनिराळ्या प्रकारे अन्याय केला यांचासुद्धा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वनाश व्हावा असे त्याला वाटत नाही.
सर्वजणांनी त्याच्या बहिरंगाकडेच पाहिले. त्याचे नामकरण झाले. ते सुद्धा ‘वृकोदर’ म्हणून. वृकोदर म्हणजे लांडग्यासारखे पोट असलेला. लांडग्यासारखा खादाड आणि क्रूर. त्याच्या अंतरंगात कोणी डोकावून पाहण्याचा प्रयत्नच केला नाही. आपल्या प्रथम पत्नीला हिडिंबेला सोडून येताना त्याच्या काय भावना असतील ? अनेक कठीण प्रसंगात ज्या पुत्राने मदत केली त्या घटोत्कचाच्या मृत्यूनंतर कृष्णाला आनंदाने नाचताना बघून त्याच्यामधल्या पित्याला काय वाटले असेल ? ज्या द्रौपदीच्या संरक्षणार्थ कायम कवच बनून राहिला, त्या द्रौपदीला आपल्याबद्दल फक्त भरवसाच आहे, प्रेम नाही हे जाणल्यावर त्याच्या मनाला काय यातना झाल्या असतील ? अशी त्याच्या मनातील आंदोलने लोकांसमोर यावीत म्हणून केलेला हा एक प्रयत्न.
Reviews
There are no reviews yet.