Description
फ्रेड उल्मान : जर्मनीतील स्टुटगार्ट येथे जन्मलेल्या फ्रेड उल्मानला वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वदेश सोडावा लागला. तो चित्रकार होता, कवी होता आणि उदरनिर्वाहासाठी कायद्याचे उच्चशिक्षणही त्याने घेतले होते. हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर होताच दोनच महिन्यात त्याने देश सोडला. फ्रांस, स्पेन या देशांत नशीब आजमावत तो अखेर ब्रिटनमध्ये स्थिरावला. युद्धाला तोड फुटल्यावर शत्रू राष्ट्राचा नागरिक म्हणून ब्रिटनने त्याला सहा महिने तुरुंगवासात टाकले. पण त्यानंतरचे त्याचे आयुष्य ब्रिटनमध्ये कलावंतांच्या सहवासात गेले. चित्रकार म्हणून तो ख्याती पावला. त्याची चित्रे ब्रिटनमधील अनेक संग्रहालयांत प्रदर्शित केलेली आहेत. रीयूनियन हि त्याची कादंबरिका प्रसिद्ध झाल्यावर दुर्लक्षित राहिली. परंतु मध्ये ती पुनःप्रकाशित झाली तेव्हा ऑर्थर कोस्लरच्या नजरेत आली, आणि मग यशस्वी ठरली.
रीयुनियन
नाझी जर्मनीच्या त्या कालखंडाचा विचारही नकोसा वाटतो. त्याच कालखंडात घडते कोन्राडिन आणि हॅन्स या दोन मित्रांच्या अधुन्या मैत्रीची गोष्ट. द्वेषपूर्ण राजकीय परिस्थितीतील जर्मनीमध्ये घडलेल्या आणि बिघडलेल्या या मैत्रीची कथा, बऱ्याच काळानंतर कधीतरी पुनर्भेट होऊन पूर्ण होते. एक आगळी, चटका लावणारी पुनर्भेट. फ्रेड उल्मानची ही नाजूक जिवाची कादंबरिका अनुवादित केली आहे डॉ. मुग्धा कर्णिक यांनी…
Reviews
There are no reviews yet.