Description
राजमुद्रा, की एक रहस्य ?
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांना राजमुद्रेचे लपवलेले एक रहस्य, जे गेल्या 350 वर्षांपासून उजागर होण्याची वाट पाहट आहे…. या उलगडयाचा थरारक प्रवास सांगतोय, खुद्द रायगड !
रवीला काहीच ऐकू येत नव्हते. तो प्रयत्न करत होता आवाज ऐकण्याचा, तो प्रयत्न करत होता श्वास घेण्याचा… तो डोहात पड़ला होता. कोणी ढकललं त्याला की तो स्वत: च पडला होता हे त्यालाही कळले नाही. तो पडला होता हेचं खरं.
जीवाच्या आकांताने त्याने हातपाय हलवण्याचा प्रयत्न केला, त्याला पोहता येत नव्हतं काही ऐकू येत नव्हते की त्या काळ्याभोर डोहात काहीच दिसत नव्हते. श्वास कोंडला होता त्याचा अंगावरचा भीजलेला एप्रॉन त्याला जड वाटू लागला. तेवढ्यात त्याच्या हाताला काहीतरी गूळगुळीत लागले. त्याने चाचपूण पाहण्याचा प्रयत्न केला, लांबसडक असं काहीतरी त्याच्या हातातून निसटून जात होतं. रवीकुमारच्या अंगावर भीतीने सरसरून काटा आला.
त्या पक्षांनी हे तर पाहिलं नसेल?
Reviews
There are no reviews yet.