Description
दर वीस वर्षे… ते सोनेरी चमत्कारी शक्तीचे महिमार जहाज आपल्या खऱ्या वारसदाराच्या प्रतीक्षेत समुद्रतळाशी असते. सूर्याच्या पहिल्या किरणासह फक्त एका दिवसासाठी ते समुद्रतळातून वरती येते… आणि दिवसभर वाट पाहते आपल्या खऱ्या हक्कदाराची… जो त्याच्यावर आरोहण करेल आणि तोच करेल या अथांग समुद्रावर राज्य… मात्र या समुद्रावर राज्य करण्यासाठी काही सैतानी शक्तीही प्रयत्नशील आहेत… जे घेऊ इच्छितात खऱ्या वारसदाराचा हक्क आणि मिळवू पाहत आहेत सोनेरी महिमारचा ताबा… या सैतानाने महिमार मिळविण्याच्या लालसेने घेतला आहे कित्येक निष्पापांचा बळी. अथांग समुद्रावर राज्य करण्याच्या हेतूने या दुष्टकर्मी सैतानाच्या हाती जर अफाट शक्तीचे हे महिमार जहाज आले तर काय होईल ?…
या महिमार जहाजाचा ताबा मिळविण्यापासून या सैतानाला कोण रोखेल ?… कोण असेल या महिमारचा खरा वारसदार ?… जो करेल या महिमारची सफर अन् मिळवेल समुद्रराजाची अपार शक्ती !… की त्याला पुन्हा प्रतीक्षा करावी लागेल पुढच्या वीस वर्षांची… महिमारपर्यंत खरा वारसदार पोहचतोय की त्याचा ताबा सैतान घेतोय… जाणून घेण्यासाठी वाचा अद्भुत, रोमांचक, जादुई अन् मैत्रीची, प्रेमाची आणि साहसाची ही मराठीतील सर्वांत पहिली समुद्रसफरीची गाथा… महिमारची सफर!
Reviews
There are no reviews yet.