Description
मानवा,
तू भ्रमात आहेस.
तू म्हणालास, ”मी निसर्गाची भाषा शिकून घ्यायला इथं आलोय.”
चूक. तू निसर्गाची भाषा शिकून घ्यायला आलेला नाहीस.
तुझ्या मनात भीती आहे.
त्या भीतीचं कारण आहे – तुला स्वत:शीच बोलता येत नाही.
तुला स्वत:शी बोलायला शिकायचंय.
तू सोबत मृतदेह आणलाय. तू म्हणतोस ,
”ह्या मृतदेहाला पुन्हा जिवंत करायचंय.”
मानवा, जेव्हा स्वत:शी बोलायला शिकशील तेव्हाच उमगेल,
तुला मृतदेहाला नाही,
स्वत:ला जिवंत करायचंय.
Reviews
There are no reviews yet.