Description
अमंगलपासून मुक्ती आणि मंगलाचा विकास, या आपल्या निकोप अस्तित्वाच्या दोन बाजू होत. या दोन्ही बाजू समान रीतींन जपायला हव्यात. अमंगलाला नकार देण्याच्या मार्गानं मुक्ती लाभते आणि मंगलाची निर्मिती करण्याच्या वाटेनं विकास साधतो. जे नकार न करता निर्मितीच्या माग धावतात, त्यांची निर्मिती असत्यानं गढूळलेली आणि लाचारीनं डागाळलेली असते. याउलट, जे निर्मिती न करता नकारातच गुंतून राहतात, त्यांचा नकार वंध्यत्वानं काळवंडलेला आणि शिळेपणातच खोळंबलेला असतो.खर तर, ज्यांना सम्यक जीवन जगायचं असेल, त्यांनी आपल्यापुढचा विषवृक्ष तोडायलाही हवा. आणि त्याच्या जागी नव्यानं अमृतवृक्ष लावायलाही हवा. विषवृक्ष न तोडताच अमृतवृक्ष लावला, तर त्या अमृतवृक्षावर विषवृक्षाची अपायकारक सावली पडणारच. याउलट अमृतवृक्ष न लावताच विषवृक्ष तोडण्याचा प्रयत्न केला, तर त्या विषवृक्षाला पुनःपुन्हा विषमय धुमारे फुटणारच !
Reviews
There are no reviews yet.