जग बदलणारा बापमाणूस

315.00

Out of stock

पुस्तकाचे नाव जग बदलणारा बापमाणूस
लेखक जगदीश ओहोळ
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २४०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित असणारे व्यक्तिमत्त्व नाही. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेले भरीव कार्य ध्यानात घेतले की, ते आधुनिक भारताचे एक महत्त्वाचे निर्माते होते, हे या पुस्तकातून दाखवून देण्याचे काम यशस्वीपणे केले आहे.  पुस्तकाची जी मांडणी आहे, ‘मोटिव्हेशनल बाबासाहेब…’ अशा रीतीने बाबासाहेब सध्याच्या पिढी समोर उभे करणे हा या पुस्तकाचा प्रमुख उद्देश आहे.  ‘उगवत्या सूर्याच्या देशात प्रज्ञासूर्य’ हे जपानमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे वर्णन हृदयाला भिडणारे आहे.  तसेच सोलापूर जिल्ह्यातील बाबासाहेबांच्या जीवनातील काही प्रसंग अगदी आपल्यासमोर घडत आहेत इतक्या प्रभावीपणे मांडले आहे. या पुस्तकातील सर्व प्रकरणांत एक समान धागा आहे. तो म्हणजे मोटिव्हेशनल आंबेडकर !

हे पुस्तक नव्या पिढीला, तरुणाईला नक्कीच आवडेल, त्यांच्या मनाला भावेल आणि त्यांच्यात लढण्याची, अभ्यासाची जिद्द निर्माण करेल, त्यांना डॉ.  बाबासाहेब आंबेडकर हे आपला नवा मोटिव्हेशनल आयडॉल’ म्हणून सापडतील, याची मला खात्री आहे.  हे पुस्तक वाचून वाचकांचं जग नक्कीच बदलेल व त्यांना बाबासाहेबांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोण प्राप्त होईल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जग बदलणारा बापमाणूस”

Your email address will not be published. Required fields are marked *