Description
हे पुस्तक म्हणजे “देवदासी प्रथेचा आणि हिंदू संस्कृतीचा पंचनामा” अस वसंत राजस यांनी स्वत: च लिहिले आहे. वैदिक वाङ्मयात स्त्री शूद्राति – शूद्रांच्या वाट्याला जे जीवन आलेले आहे त्याचं वर्णन महात्मा फुल्यांनी ‘गुलामगिरी’ या ग्रंथात केले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत ब्रिटिश गुलामगिरीबद्दल लिहिले गेले, चळवळी झाल्या आणि ब्रिटिशांचे राज्य लयाला गेलं. परंतु महात्मा फुल्यांनी वर्णन केलेल्या गुलामगिरिच भुत आजही प्रत्येक भारतीयांच्या मानगुटीवर बसलेले आहे. स्त्री – जीवनाचा विचार कुलशीलाच्या भाषेत स्पष्टच बोलायचे झाल्यास योनि शुचितेच्या कल्पनेत केला जातो. पुरुषाला अमर्याद लैगिंक स्वातंत्र्य, शिवाय तो शारीरिकदृष्ट्या बलवान असल्याने जनानखाने, अंत:पुरे अस्तित्वात आली. श्री. वसंत राजस यांनी बंगालमधील कापालिक पंथाबद्दल लिहिले आहे. ‘कूल म्हणजे शक्ती ( स्त्री – योनी) आणि अकूल म्हणजे शिवलिंग. कुलाच्या ठिकाणी अकुलाचा संबंध येणं म्हणजेच ‘कौलमार्ग ‘ होय, अशी उपपत्ती सांगितली आहे. दुनियेतल्या जवळपास सर्व धर्मात स्त्रीची अवहेलना झाली आहे. एकही धर्मपुस्तक स्त्रीने लिहिले नाही, हे फुल्यांचे ऐतिहासिक निरीक्षण आहे आणि अशा धर्मपुस्तकात पुरुषांनी केलेल्या ‘गोमा’ फुल्यांनी उघडं केलेल्या आहेत. स्त्री- मुक्तीच्या चळवळीत फुल्यांचे विचार योगदान फार मोठे आहे.
Reviews
There are no reviews yet.