Description
विष्ठा म्हटलं की ओंगळ, दुर्गंधी असलेलं, नकोसं वाटणारं, त्रासदायकही होणारं, असं काहीतरी, असं वाटणं साहजिक आहे. पण हा पदार्थही उपयुक्त असू शकतो, हे या पुस्तकाच्या मनोरंजक विश्लेषणातून जेव्हा समोर येतं, तेव्हा चकीतच व्हायला होतं. आपला दृष्टीकोनच बदलायला हवा आणि वेगळ्याच प्रकारे विज्ञानाचा अभ्यास आपण करायला हवा, हे लख्खपणे समोर येतं.
शेण, लेंड्या, कोंबडीची विष्ठा हे तर मानवाला अत्यंत उपयुक्त आणि रोजच्या जीवनाशी निगडीत असणारे पदार्थ आहेत. काहींच्या विष्ठेपासून कागद तयार होतो, एवढेच नाही तर काही प्राण्यांची, पक्ष्यांची विष्ठा ही सौंदर्यप्रसाधने, सुवासिक अत्ताराप्रमाणे आपल्या रोजच्या वापरात आहेत, हे जाणून तर मजाच वाटते.
विष्ठेचे विविध प्रकार, त्याची तपासणी आणि त्यातून काय कळते हे जेवढे रंजक तेवढेच महत्त्वाचे. विज्ञान विषयातील या वेगळ्या विषयाकडे सजगपणे पाहणारे, पण कोठेही ओंगळ होऊ न देता लिहिलेला, कोणासही आवड़ावे असे, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना तर एखाद्या संदर्भ ग्रंथप्रमाणे जरूर संग्रही ठेवण्यासारखे आणि थोडक्यात महत्त्वाचे असे, अतिशय साधेपणाने सांगणारे हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरावे.

Reviews
There are no reviews yet.