Description
वाडी, गाव, नगरे व महानगरे जपण्यासाठी विशिष्ट हेतुपूर्वक ऐतिहासिक वारसा जपण्याची दृष्टी ठेऊन कार्य करावे लागते. गावाचा भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक ठेवा जतन करणे आवश्यक आहे. गावातील वास्तू या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असून त्या-त्या वेळी त्यांनी त्या युगाचे प्रतिनिधित्व केलेले असते. गावाच्या अंतरंगावर जिज्ञासेचा प्रकाशझोत टाकल्यावर त्याच्या इतिहासाचा विस्तृत व सलग असा कालपट डोळ्यांसमोर उभा राहतो.
असाच स्थानिक इतिहासाचा कालपट ‘माझं गाव माझी माणसं ‘ या ग्रंथामधुन श्री.दावल दामोदर ठिकेकर यांनी उलगडून दाखविला आहे. हा ग्रंथ ठिकेकरवाडीच्या इतिहासाची साक्ष देणारा आहे. त्यांचे हे पाऊल दमदार पडले असून त्यांनी त्यासाठी घेतलेले कष्ट प्रशंसनीय आहेत. वाचक त्यांचे स्वागतच करतील अशी मला खात्री वाटते.
Reviews
There are no reviews yet.