Description
“दिवाळी फराळाचे पदार्थ म्हणजे केवळ खाण्याचे पदार्थ नाही तर माणसांना जवळ आणणारे, खाद्यसंस्कृती अभ्यासक मृणाल तुळपुळे यांचे शब्द कृतज्ञतापूर्वक वापरुन ‘फराळ म्हणजे केवळ खाद्यपदार्थांची मेजवानी नसून प्रेम जपण्याची आणि संस्कृती पुढे नेण्याची परंपरा आहे.’ इतिहासामध्ये समग्र हा इतिहास प्रकार अभ्यासत असताना खाद्यसंस्कृतीचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. दिवाळी फराळ हा एका अर्थाने खाद्यसंस्कृतीचा महोत्सव आहे. या खाद्यसंस्कृती महोत्ावाविषयी या पुस्तकात विविध ठिकाणची संकलित केलेली माहिती संपादकीय संस्करण करुन या पुस्तकात दिली आहे.
या पुस्तकात दिलेले पदार्थ पारंपरिक आहेत. फराळ प्रसंगी बाजारातून नाईलाजाने घ्यावे लागते. मात्र घरची चव ती घरची. पाहुण्यांचे आदरातिथ्य. आपणही इतरत्र पाहुणे म्हणून जातो. फराळ खाल्ला की त्यास मनमुराद दाद द्यावी. आपली चकली, लाडू फारच छान, सोनेरी-तपकिरी चकली म्हणजे जणू सोन्याचा दागिना. आपली दीपावली ज्याप्रमाणे खाद्यसंस्कृतीचा महोत्सव आहे तसाच बहिण-भाऊ यांच्या नात्यांचा प्रेमोत्सव आहे.”

 
							 
							 
							 
							 
							 
							 
							 
							 
							 
							 
							 
							 
	
Reviews
There are no reviews yet.