Description
सगळ्यांनाच आपापली गुपित इतरांपासून जपायची तर असतात; पण ती ठरावीक जणांना कळवायचीही असतात. तसच ती हळूच कुठेतरी साठवूनही ठेवायची असतात. त्यासाठी वापरली जाणारी गूढ भाषा म्हणजे ‘च’ ची भाषा. ग्रीक – रोमन काळामधल्या राजेमहाराजांच्या काळापासून ते आजच्या इंटरनेट – मोबाईलच्या युगापर्यंत या गुपितांविषयी माणसाला विलक्षण कुतूहल वाटत आल आहे . एका प्रकारे हा चोर – पोलिसांचा खेळच आहे. गुपित फुटू नयेत म्हणून ती गुपित राखू पाहणाऱ्यान खूप प्रयत्न करायचे, आणि ती गुपित फोडण्यासाठी दुसऱ्यान अफाट ताकद लावायची, असा हा चित्तथरारक खेळ आहे. आजवरच्या दोन्ही महायुद्धांना कलाटणी देण्यातही या गुपितांनी आणि त्या गुपितांच्या फुटण्याने मोठा हातभार लावला आहे. कम्प्यूटर आणि इंटरनेट यांच्या आगमनामुळे यातली लज्जत अजूनच वाढली आहे. अलीकडच्या ‘ विकीलीक्स’ नी तर जगभर नुसती खळबळच माजवून दिली आहे!
अशा या गुपितांच्या चढाओढीचा हा खेळ म्हणजेच ‘च’ ची भाषा वापरायचा रोमहर्षक खेळ आहे. त्यात या ‘च’ च्या भाषेमधले थरार आहेत, त्या भाषेमुळे घडलेले चित्तथरारक प्रसंग आहेत आणि ती फुटल्यामुळे झालेल्या सनसनाटी घडामोड़ीसुद्धा आहेत. या सगळ्याचा प्रवास इथे मांडला आहे आणि त्याबरोबरच या ‘च’ च्या भाषेचा अत्याधुनिक अवतारही इथे सादर केला आहे.
Reviews
There are no reviews yet.