Description
आपले राष्ट्र म्हणजे त्यातील समाधानी लोक नसून एक भूप्रदेश समजण्यात येतो. भूमि अधिकाराकडे जाणारे मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून शोधले आहेत. भूमि अभिलेखाच्या आधारे ऐतिहासिक कालखंडापासून तत्कालीन भूमि अधिकार जाणून घेण्याचा खटाटोप केला आहे.
“सामाजिक जातीविषमता आणि भूमि अधिकार या एकमेकांना पुरक बाबी आहेत. त्यामुळे प्रभुत्वशाली जातींचे अधिकार कधीही संपुष्टात येणार नाहीत. दलितांना जमीनदारांसारख्या जमीनीच्या मालकीमुळे मिळणारी साधनसंपत्ती आणि प्रतिष्ठा मिळणे कधीही शक्य होणार नाही. यासर्व बाबींचा विचार करूनच बाबासाहेबांनी आरक्षण आणि धर्मातर घडवुन आणले. आरक्षणामुळे संधी मिळेल आणि धर्मांतरामुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. संविधानात अशा तरतुदी मान्य करण्यात आल्या तरी संधी आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठीचा संघर्ष अजुनही संपलेला नाही.”
‘भूमि अधिकार” जमीन विभाजनाचे संशोधन या पुस्तकात भूमि अभिलेखास अनुसरून सामाजिक माहिती लिहण्यात आल्यामुळे पुस्तकाचे महत्त्व अबाधित राहणार आहे.
Reviews
There are no reviews yet.