Description
सतत बदलणाऱ्या परिस्थितीत, वातावरणात राहायचे, जगायचे तर तुमच्यात बदल करत, जुळवून घेत गेलात तर जगणे शक्य आहे, अन्यथा नाश अटळ आहे. जे सजीव जुळवून घेत नाहीत ते प्रवाहाबाहेर फेकले जातात व विनाशाकडे जाऊ लागतात. बाहेर सतत होणाऱ्या बदलाशी जुळवायचे, त्याला तोंड द्यायचे, तर आपण आपल्यात बदल करणे याला पर्याय नाही. “बदला वा नष्ट व्हा” हाच एक संदेश असतो. आपले हात, पाय, नाक, डोळे, हृदय इत्यादीत बदल करणे शक्य नाही. आपले वर्त्तन, स्वभाव, प्रतिसाद इत्यादीत योग्य बदल करणे शक्य नाही. हे बदल मेंदूत बदल होण्यातूनच साकारतात, म्हणजे मेंदूत बदल होतो हे वास्तव असेल पाहिजे. तशी क्षमता मेंदूत असते. मेंदूच्या या क्षमतेला आपणही हातभार लावला तर फायदा आपलाच होणार आहे. हे होणारच नाही, अशक्य आहे असे म्हणणे किंवा एकूणच नकारात्मक भूमिका घेणे अयोग्य आहे. त्यामुळे आपला तोटाच आहे. आता आपलाच फायदा तोटा आपणच बघणार नसू तर गोष्ट वेगळी !

Reviews
There are no reviews yet.