शूद्र पूर्वी कोण होते

₹270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव शूद्र पूर्वी कोण होते
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ISBN 978-93-94925-59-5
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या २९६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६४० ग्रॅम

Description

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चातुर्वर्ण्यांतर्गत आहेत. तर्कानुषंगानुसार अस्पृश्य किंवा अतिशूद्र हे चातुर्वर्ण्यांच्या बाहेर आहेत. द्विज आणि अद्विज हे परस्पर विरोधी मानले जातात. द्विज म्हणजे शब्दश: दोनदा जन्म झालेले आणि अद्विज म्हणजे ज्यांच्या केवल एकदाच जन्म झालेले आहे असे. हा  फरक उपनयनाच्या अधिकारावर आधारित आहे. शूद्र आणि अतिशूद्रांना यज्ञोपवित (जानवे) घालण्याचा अधिकार नाही. त्या अनुषंगाने ते दोन्ही अद्विज आहेत. शूद्र आणि अतिशूद्र हे अद्विज आहेत, हे लक्षात घेऊनही, मग शूद्रांना सवर्ण का मानण्यात येते आणि अतिशूद्रांना अवर्ण का मानण्यात येते ? त्यातील पहिला वर्ग चातुर्वर्ण्यांतर्गत आहे आणि नंतरचा वर्ग चातुर्वर्ण्याबाहेर का आहे ? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चातुर्वर्ण्याच्या चौकटीत आहेत. ते सर्व सवर्ण आहेत. असे असले तरी शूद्रांना त्रैवर्णिकांचे अधिकार का नाकारले आहेत ? शूद्रांच्या कोड्यापेक्षा मोठे गूढ असू शकते काय ? त्यामुळेच ते कोण होते आणि हिंदी – आर्य समाजातील चौथा वर्ण ते कसे  झाले याची तपासणी आणि स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शूद्र पूर्वी कोण होते”

Your email address will not be published. Required fields are marked *