Description
शिवाजीराजांची लढाई आदिलशहा, मुघल, सिद्दी, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध होती; पण ती राजकीय लढाई होती, धार्मिक लढाई नव्हती हे स्पष्ट होते. शिवरायांच्या सैन्यात 35 टक्के सैन्य मुस्लिमांचे होते. त्यांच्या 27 अंगरक्षकांपैकी 10 अंगरक्षक मुस्लिम होते. त्यांचे पहिले चित्र रेखाटणारा मीर महंमद हा मुस्लिमच होता. आरमारदलाचे प्रमुख दर्या सारंग व दौलतखान हे मुस्लिमच होते. असे असंख्य मुस्लिम शिवरायांकडे होते. म्हणजे शिवाजीमहाराज धर्मनिरपेक्ष म्हणजेच समता, मानवतावादी होते. त्यांच्या चरित्रामधून आपणास अशारीतिने सर्व धर्म समभावाचा संदेश मिळतो.
Reviews
There are no reviews yet.