Description
”भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न” हां महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा अस्पृश्यतेच्या समस्येचे मूलगामी विवेचन करणारा ग्रंथ. विसाव्या शतकाच्या प्रारंभी या प्रश्नाचे अशा प्रकारचे देशव्यापी संशोधन झालेच नव्हते. क्रांतीबा फुल्यांच्या नंतर या प्रश्नाची विवेचक मांडणी करून, महर्षींनी ही कोंडी फोडली. अनेक लेख लिहून, सरकार दरबारी आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीच्या मंचावर अनेक निवेदने देऊन अन ठराव मांडून या प्रश्नाला चळवळीचे स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. ”डिप्रेस्ड क्लासेस मिशन” ही संस्था स्थापून प्रत्यक्ष अस्पृश्योद्धाराचे कार्यही महर्षी शिंद्यांनी केले.
पुढे जाती निर्मूलनाच्या चळवळीच्या नेतृत्वाची धुरा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारली. परंतु ‘स्वतंत्र मतदार संघा’ च्या प्रश्नावर त्यांचे व वि. रा. शिंद्यांचे मतभेद झाले.
या पार्श्वभूमीवर एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी शुरू असलेल्या जातीभेद-विरोधी अन जातीवाद- विरोधी चळवळींना या धुरीणांचे विवेचक संशोधन निश्चितच सहाय्यभूत होईल.

Reviews
There are no reviews yet.