Description
“गंमत अशी की, हिंदूमध्ये कुणीही क्षत्रिय नसल्याची बतावणी करणाऱ्या ब्राह्मणांपैकी जगन्नाथ पंडिताने मात्र ‘दिल्लीश्वरौ वा जगदिश्वरौ वा’ म्हणजे दिल्लीचा बादशहा अकबर हा जगदीश्वर आहे, अशी घोषणा करून टाकली होती. त्या काळात देवपूजेच्या आधी सारे ब्राह्मण यमुनेत सचैल स्नान करून उन्हातान्हात मध्यान्हापर्यंत अकबर बादशाहाच्या दर्शनास रस्त्यावर उभे राहत. अकबर रात्रभर नाचगाण्यात विलासमग्न राहत असे. त्यामुळे उशिरा झोपून उठला की, केव्हातरी भरदुपारी राजवाड्याच्या बाहेर दर्शनास येई. दारूने झिंगलेल्या अवस्थेत कधी हात तर कधी फक्त पाय दाखवून तो आत जाई. त्यालाच ‘ईश्वरदर्शन’ समजून मग सारे ब्रह्मवृंद संध्या-तर्पणादी विधी करीत.” भूतकाळातील ब्राह्मणांचे हे लाचार रूप पाहिले व मोगल पातशाहीसमोर लोळण घालणाऱ्या भटाभिक्षुकांनी शिवरायाला मात्र अपमानास्पद वागणूक दिली, हे वाचले की तळपायाची आग मस्तकाला पोचल्याशिवाय राहत नाही.
Reviews
There are no reviews yet.