Description
“असेलही, माझे आयुष्य चारच दिवसांचे असेलही; पण माझ्या आकांक्षेची मशाल शेवटचा श्वास असेपर्यंत माझ्या हृदयात पेटती राहील आणि उद्या जरी मी नसलो तरी माझ्या आकांक्षा देशाच्या आकांक्षा होऊन साम्राज्यवादी आणि भांडवलदारी शोषणकर्त्यांचा शेवटपर्यंत मुकाबला करीत रहातील. माझा माझ्या देशाच्या भवितव्यावर विश्वास आहे. मी विश्वाच्या मानवतेला नव्या युगाकडे वळताना पहातो आहे. माझा मानवाच्या शौर्यावर व त्याच्या बाहुबलावर विश्वास आहे. म्हणून मी आशावादी आहे. प्रेषितांविषयी बोलावयाचे झाल्यास, जर त्यांनी पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता तर आज जगाची अशी दुर्दशा दिसली नसती जी आपण आज पहात आहोत. प्रेषितांनी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याऐवजी आकाशात स्वर्ग दाखविला. म्हणून ते निर्माते होऊ शकत नाहीत. आजचा नवा मानव हवेत महाल बांधू इच्छित नाही. त्याने आपल्या स्वर्गाचा पाया पृथ्वीच्या याच भक्कम जमिनीवर खणण्यास सुरुवात केली आहे. आजचा प्रत्येक मानव प्रेषित आहे. म्हणून माझा मानवावर विश्वास आहे.”
– शहीद भगतसिंग
Reviews
There are no reviews yet.