Description
काव्यवाचन, कथाकथन, नाट्यवाचन असे काही प्रकार वगळले; तर वाचन ही एकट्याने, एकांतात करावयाची वैचारिक कृती असते. लेखनाविष्कार आणि वाचनाचा अनुभव दोघांमध्ये लेखक दुवा साधण्याचे काम करतो. त्यास आपण ‘लेखक – वाचक संवाद’ असे म्हणतो. कोणत्याही लेखनास ग्रंथरूप प्राप्त झाले की लेखक – प्रकाशकाचे काम संपते. येथून पुढे वाचकांची भूमिका अर्थपूर्ण ठरते.
व्यक्ती मंदिरात जाते. मनोभावे हात जोडते. प्रार्थना करते. त्यासा एकाग्रतेने भक्तिभावाने आपण ग्रंथवाचन केले पाहिजे. ग्रंथ हेच देव आहेत ही भावना यापाठीमागे आहे. देव एखाद्या मूर्तीमध्ये शोधणे तसाच तो ग्रंथ आणि वाचकांमध्ये शोधावा बस एवढेच. वाचन संस्कृतीचे स्वरूप बदलले. आधुनिक डिजिटल साधने आली. वाचनाची संस्कृती निरंतर टिकून राहणार आहे. आपल्या घरात किमान दोन – चार मोबाईल फोन असतात. तेवढ्याच किंमतीची ग्रंथसंपदा असणे गरजेचे आहे. ग्रंथवाचन जीवनावश्यक बाब झाली पाहिजे. ‘वाचाल तर वाचाल’.
ग्रंथवाचनाविषयीचे तीन टप्पे सांगता येतील. पहिल्या टप्प्यांमध्ये माणूस आपन होवून ग्रंथांकडे आकर्षित होतो. दुसऱ्या वेळी ग्रंथ माणसाला म्हणजे वाचकाला खुणावून बोलवत राहतात. तिसऱ्या आणि शेवटच्या अवस्थेत दोघेही एकमेकांना सोडत नाहीत.
Reviews
There are no reviews yet.