Description
अभिवादन
घनदाट जंगलातून बाहेर येण्यासाठी गोंधळलेल्या माणसाला एखादी लहानशी का होईना पण पाऊलवाट म्हणजे आशेचा किरण असतो. मग यासाठी कुणाची तरी धडपड सुरू होते. खर तर कोणत्याही विचारांची, कार्याची म्हणा की एखाद्या लोककल्याणकारी चळवळीची म्हणा. सुरूवात महत्वाची ठरते. भारतीय समाज पुरूषप्रधान असला तरी, समसमान अस्तित्व अन पावलोपावली महत्त्व असणाऱ्या स्त्रियांना शिक्षण मिळालेच पाहिजे. त्यांच्यातील अंगभूत क्षमतांचा विकास होऊन त्यांनाही सन्मानाने जगण्याच वातावरण मिळण्यासाठी पहिल पाऊल टाकून, तळमळीने, नेटाने आयुष्यभर स्त्री शिक्षणाच व्रत सांभाळणाऱ्या क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला सल्यूट करावाच ! स्त्री शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार – प्रचार करणारे महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले म्हणजे 19 व्या शतकाला खऱ्या अर्थाने अलंकृत करणारे मानवी रत्नच आहे.
फुले दाम्पत्यांनी त्या काळात ज्ञान आणि स्वातंत्र्याचा एक लहानसा प्रवाह सुरू केला. त्याला आता प्रचंड स्वरूप आलय. आज शिक्षणाचीच नव्हे तर प्रत्येक कार्यक्षेत्राची कवाडे स्त्रियांना खुली झालीत. जात, धर्म, पंथ, वर्ग वगैरे कोणताही भेद समजला जात असला तरी अखिल स्त्रियांचे खरे दैवत सावित्रीआईचे आहेत, हे मानल की कृतज्ञेचा भाव मनाला सुखावून जातो. आज स्त्री तिच्या कार्यक्षेत्रात नव्हे तर माणूस म्हणून बहरलेली जाणवते. यामुळे बऱ्याचदा मनात येते – घरात ठेवाव्याश्या वाटणाऱ्या तसबीरीत फुले दाम्पत्याची तसबीर ठेवलीच पाहिजे. कृतज्ञतेचा सल्यूट क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांना केलाच पाहिजे, इतक मोलाच कार्य या दाम्पत्याच आहे.
श्री. मोगल जाधव यांचे हे पुस्तक म्हणजे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेला अन कार्याला मानवंदनाच आहे.
Reviews
There are no reviews yet.