Description
“खंदा सत्यशोधक”
१९२६ सालीच ‘प्रबोधन’कारांनी आपल्या ‘प्रबोधन’मधून ‘सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्पपरिचय’ या नावाने भाऊरावांचे छोटेसे चरित्र प्रकाशित केले होते. अद्यापि भाऊरावांना ‘कर्मवीर’ ही पदवी लावली गेली नव्हती. महाराष्ट्राला त्यांची पहिली ओळख ‘खंदा सत्यशोधक’ म्हणूनच होती. अशा या ‘सत्यशोधक’ भाऊरावांचे चरित्र त्यांनी कोल्हापूरच्या डांबर प्रकरणापर्यंत दिले होते. त्या पुढच्या भाऊरावांच्या दहा वर्षांच्या कामाचा वृत्तान्त ते ‘प्रबोधना’च्या पुढील अंकात देणार असावेत; पण तेवढ्यात सातारच्या डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेटने फर्मान काढून त्या चरित्र प्रकाशनावर बंदी आणली.
Reviews
There are no reviews yet.