Description
साहित्याचा अभ्यासक जेव्हा एखाद्या साहित्यकृतीचे परिशीलन करत असतो, तेव्हा दोन प्रक्रिया होतात. त्याची संवेदनशील बुद्धी त्या साहित्यकृतीत त्याला अस्फुटपणे जाणवणाऱ्या जीवनसत्याचा शोध घेत असते. त्याच्या पूर्ण दर्शनासाठी आसुसलेली असते. त्याचवेळी त्याचे कलासक्त मन त्या कलाकृतीमधील सौंदर्याचा वेध घेत असते. या दोन्हींच्या योगे साहित्यानुभव सुफळ, संपूर्ण होत असतो. अशाच प्रकारे साहित्यातील सत्याचा शोध आणि सौंदर्याचा वेध घेणाऱ्या काही लेखांचा समावेश या पुस्तकात आहे.
Reviews
There are no reviews yet.