साने गुरूजी

150.00

Out of stock

पुस्तकाचे नाव साने गुरूजी
लेखक सुचिता पडळकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ९२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६२ ग्रॅम

Description

लहान मुलांना जिव्हाळ्याने गोष्टी सांगणाऱ्या माणसाची ही गोष्ट ती सांगता सांगता लेखिका त्या माणसाच्या आपल्याला अपरिचित अशा कितीतरी गोष्टी सांगते. फुलासारख्या काळजासोबत त्याला वज्रनिर्धाराचे वरदानही लाभले होते. त्याने एवढ्याशा आयुष्यात कितीतरी जन्मांचे काम केले. शेतकरी-कामगारांचे लढे लढवले. उज्ज्वल पत्रकारिता केली. शंभरेक पुस्तके लिहिली. तमिळ, इंग्रजी, गुजराथी अशा विविध भाषांतून ललित व वैचारिक साहित्याचा मराठीत शैलीदार अनुवाद केला. महात्मा गांधींचा आदेश अव्हेरून पंढरपूरचे विठ्ठलमंदिर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह केला. स्त्रियांनी रचलेल्या लोकगीतांचे संकलन केले. ‘भारतीय संस्कृती’सारखा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. राष्ट्र सेवा दलाची पायाभरणी केली. स्वातंत्र्यलढ्यात अनेकदा तुरुंगवास भोगला. तुरुंगवासात स्वतःचे स्वतंत्र लेखन केले, त्यासोबतच विनोबांची ‘गीता प्रवचने’ आणि जावडेकरांची ‘महात्मा गांधी दर्शन’ ही व्याख्याने साने गुरुजींनी लिहिली. ‘साप्ताहिक साधना’ व ‘आंतरभारती’ यांसारखी अनोखी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात आणली… संतांप्रमाणे खऱ्या धर्माचे आणि सत्याचे सार काढून लोकांसमोर ते सोप्या शब्दांत मांडले.

‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असे सांगणाऱ्या साने गुरुजींचे हे चरित्र. त्यांच्याच विचारांचे बाळकडू पिऊन मोठ्या झालेल्या व त्यांच्याप्रमाणे लहान मुलांमध्ये रमणाऱ्या लेखिकेने ओघवत्या शैलीत लिहिल्याने त्याचे मोल खचितच वाढले आहे. ‘गांधी-१५०’च्या निमित्ताने युवा पिढीला नवभारताच्या निर्मात्यांची तोंडओळख करून देणाऱ्या ‘गांधीजन चरित्रमाला’मधील हे एक महत्त्वाचे पुष्प ! 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साने गुरूजी”

Your email address will not be published. Required fields are marked *