पंडित जवाहरलाल नेहरू

150.00

Out of stock

पुस्तकाचे नाव पंडित जवाहरलाल नेहरू
लेखक हेमंत कर्णिक
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १०८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

जवाहरलाल नेहरूंचे सारे चरित्र म्हणजे सुरस व चमत्कारिक प्रसंगांनी भरलेली एखादी रोमहर्षक कादंबरीच. तोंडात चांदीचा चमचा घेऊन झालेला जन्म, कर्तबगार पित्याचा वारसा, राजबिंडे रूप, धारदार बुद्धिमत्ता, उत्तम वक्तृत्व आणि राजकारणाच्या धबडग्यातही जपलेला पारदर्शक सच्चेपणा, कोट्यवधींचे प्रेम लाभूनही आयुष्यात आलेले एकाकीपण, जन्मदाता पिता आणि पितृतुल्य गांधीजी यांच्यावरील प्रेम आटू न देता त्यांच्याशी केलेला संघर्ष.

फाळणीची भळभळती जखम उरात घेऊन जन्मलेल्या भारत देशाचे भविष्य डळमळीत होते. नेहरूंनी देशाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांना पावलोपावली धर्मांधता व सूडभावना, संस्थानिकांची स्वार्थी वृत्ती, देशाचे तुकडे करण्यासाठी टपलेल्या आंतरराष्ट्रीय महाशक्ती यांचा मुकाबला करावा लागला. जातिधर्मांत विभागल्या गेलेल्या, सरंजामी वृत्ती, रूढी- अंधश्रद्धा यांत रुतलेल्या या खंडप्राय देशात समता-न्याय-लोकशाहीची बीजे रुजविणे महाकठीण होते. त्यापलीकडे जाऊन टाचणीचाही कारखाना नसणाऱ्या देशात पोलाद, विमाने व अणुऊर्जा यांचे उत्पादन करायचे होते, आधुनिकतेची पायाभरणी करायची होती.

असंख्य संकटांचा मुकाबला करून नेहरूंनी या देशाची मुहूर्तमेढ कशी रोवली, याची ही कहाणी. इतिहासाशी प्रामाणिक राहून सांगितलेली. ती वाचताना तो सारा काळ तेव्हाच्या सर्व आव्हानांसह डोळ्यांपुढे उभा राहतो. नेहरूंबद्दलच्या अपसमजांचे फुगे आपोआप फुटतात. काहींना त्यांचा एवढा द्वेष का करावासा वाटतो, हेही सहजच ध्यानात येते. सहजतेने सांगितलेला हा वस्तुनिष्ठ इतिहास देशाविषयी प्रेम असणाऱ्या लहान-थोरांनी वाचायलाच हवा.

‘गांधी-१५० च्या निमित्ताने युवा पिढीला नवभारताच्या निर्मात्यांची तोंडओळख करून देणाऱ्या ‘गांधीजनबालचरित्रमालेतील हे एक महत्त्वाचे पुष्प

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पंडित जवाहरलाल नेहरू”

Your email address will not be published. Required fields are marked *