Description
जे घाव झाले, त्यांच्या जखमा आता बऱ्या झाल्या आहेत. अजूनही घाव होत असतातच, पण त्या घावांनी जखमा होऊच नयेत अशा रीतीनं मनाला Wound-Proof बनवण्याचा शक्य तितका प्रयत्न आता करीत असतो. शिवाय, जुन्या जखमांचे वणही आता पुसट झालेत. खरं तर ते पुसट वणही बुजून जावेत, अशा निरामय अवस्थेकडं प्रवास करण्याची धडपड आहे. आणि अनेक जखमांचे वण बुजलेही आहेत – मग आणखी काय हवं ? ….. उरलेला प्रवास करीत असताना बाहेरच्या सामाजिक आकाशात अनिष्ट अभ्रांनी कितीही थैमान घातलेलं असलं, तरी आपलं मन शक्य तितकं निरभ्र रहावं, हि आस जरूर आहे. परिपूर्ण निरभ्रतेचं सर्वोच्च शिखर गाठता येईल, असा दावा नाही. परंतु त्या दिशेने जास्तीत जास्त पावलं पडवीत, अशी उत्कट इच्छा मात्र आहे !
Reviews
There are no reviews yet.