Description
सर्व मानव प्राणी एका ईश्र्वराची लेकर असून, तो सर्वावरच सारखे प्रेम करतो. आपआपसांत जातीभेद माजवून ऊच नीचत्वांच्या जोरावर ब्राह्मणांनी केवळ सोवळ्या ओवळयाचे बंड माजविले व कपटाच्या जोरावरच ते इतरांचे देव बनले. कष्ट न करता स्वत:चा तळीराम गार करण्यासाठी भिक्षुकशाहीने देशातील अखिल जनतेत धर्मभोळेपणा उत्पन्न केला. आपली चैन निरंतर चालू राहावी म्हणून जनतेचे शिक्षण तोडून तिला आद्न्यानात ठेवण्याची कोशिश केली. कथा शास्त्र व पोथ्या पुराणे रचून त्याद्वारे लोकांचा स्वाभिमान मारला. जातिभेदाचे अभेद्य तट पाडून समाजाची छकले पाडली. आपले स्वामित्व कायम रहावे म्हणून जातीजातीत ऊच नीचपणाचे आपपर भाव उभे करून ठेविले. आपण नीच आहोत ऐसा प्रत्येकात भास् उत्पन्न केला व तसे मानण्याचे प्रत्येकात समाधान उत्पन्न केले! अशा प्रकारे भिक्षुकशाहीने स्वत:च्या स्वार्थासाठी हिंदू समाजाची बुद्धी मारली, स्वाभिमान मारला व बाला नष्ट केले . पेशवाईत तर या गोष्टी थेट कळसास जाऊन पोहचल्या. याचा परिणाम साहजिकच असा घडून आला की, देशातील मराठी स्वराज्य बुडून परकीय अशा इंग्रजी राजसत्तेचे पाय या देशाला लागले. देशाच्या पारतंत्र्याचे हे मूळ जोतीरावांच्या चांगलेच लक्षात आले.
Reviews
There are no reviews yet.