Description
वादाच्या उपाधीपासून दूर जाऊन नंतर जोतीराव समजावून घ्यावे लागतात, सामाजिक वादांचे ते विविध धार्मिक व राजकीय प्रश्न आता कालबाह्य झाले असल्यामुळे जोतीरावांच्या खुद्द चहात्यानी म. फुले काय शिकवितात व त्या आत्मपरीक्षण, आत्मोन्नतीचा केवढा मोठा नैतिक विधायक भाग आहे तो रचनात्म भाग आता हुडकून काढून, सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे त्यांच मानवतावादी, मूलगामी आणि विश्वधर्मात्मक दृष्टी समजते. ‘गुलामगिरी’ या त्यांच्य कडवट वाटणाऱ्या पुस्तकामागे देखील मानवतावादी व मूलगामी विचारसरणी आहे. है। देखील खोल अभ्यासांती कळून चुकते. धर्म व नीति यच्चयावत् स्त्रीपुरुषांना समान व निःपक्षपाती असावी कायदे सर्वांना सारखे असावेत, समान हक, सत्य, समानता, स्वातंत्र्य, न्याय, समान संधी, मानवी बंधुत्व वगैरेबाबत जागतिक व सार्वभौम सत्ये जोतीबानी सांगितली आहेत व हा पुष्कळ भाग वादातीत आहे. तत्त्वज्ञान व ते अंमलात आणण्याचा नैतिक कार्यक्रम देखील फुल्यांच्या विचारसरणीत सापडतो. त्यांच्या विचारांचे व्याकरण – अन्वयार्थ यापुढे विधायकपणे, त्यांच्या चहात्यानी व अनुयायानी पूजकांनी समजावून घेतला पाहिजे. लोकशाही, निधर्मीवाद (धर्मपंथ संप्रदाय यांच्या पलीकडची भेदातीत दृष्टी), समाजवाद व विकेंद्रीकरण वगैरे आधुनिक मुद्यांना व नव विचारांना पूरक असा बराच भाग म. फुले यांच्यात आहे. त्यानी प्राकृतजन, आर्यपूर्व आदिवासी, दलित व विशेषतः अस्पृश्य मानलेली गरीब जनता यांची बाजू व स्त्रियांची बाजू मांडल्यामुळे, त्यांची विचारसरणी प्रगत मानवतावादापुढे वाटचाल करून पुढे गेलेली आढळते. त्यांचे सामाजिक, धार्मिक व आर्थिक व्याकरण समजून घेतल्यावर भाषेच्या ठेवणीचा प्रश्न उरत नाही. रानांत कित्येक फुले सुगंधीत व मोहक असतात. तेवढीच तोडून त्यांचा सुवास घ्यावा, घाणेरी, धोतरे, गुलमुस वगैरेंना सुवास नसलेली असतात म. फुल्यांच्या बागेतील चमेली, मोगरा, गुलाब, जाईजुई, प्राजक्त यांचा आस्वाद घेता येतो.
‘महात्मा फुले, सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन या पुस्तकातून उद्धृत
ReplyForward
|
Reviews
There are no reviews yet.