Description
सुसंस्कृत देश म्हणून ओळखला जाणारा आपला भारत भ्रष्टाचारी देश म्हणूनही ओळखला जातो. ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ च्या आकडेवारीनुसार १८० देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ८० वा आहे. याचाच अर्थ भारतापेक्षा भ्रष्टाचारी असे १०० देश या जगात आहेत, त्याचप्रमाणे ७९ देश भारताच्या तुलनेत ‘स्वच्छ’ देश आहेत. म्हणूनच ‘भ्रष्टाचार हा आपल्या देशाचा चेहरा आहे का?’ असा प्रश्न पडतो. त्या अनुषंगाने भ्रष्टाचार म्हणजे काय?, त्याचे स्वरूप, त्याचा उगम, कसा होतो भ्रष्टाचार, त्याचे प्रकार, त्यावर नियंत्रणासाठीचे उपाय आणि ‘भ्रष्टाचार हा भारताचा चेहरा आहे का’ याबाबत जाणून घेऊ या…..
भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत फारच पुढे आहे. सत्तेचा व अधिकाराचा उपयोग अधिकाधिक संपत्ती मिळविण्यात होत आहे. समाज व राष्ट्रासाठी आपण काही देणे लागतो, ही भावना वाढीस लागल्याशिवाय भ्रष्टाचार कमी होणार नाही. भ्रष्टाचाराचे देशातील भीषण स्वरूप पाहता, हे संकट रोखण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे, हे लक्षात येते. त्यासाठी केवळ पोलिसी जाळे पुरेसे नाही, तर त्याला लोकआंदोलनाची जोड दिली पाहिजे. भारताने आता सर्वांत ‘स्वच्छ’ देश होण्याकडे वाटचाल करायची की सर्वांत ‘भ्रष्ट’ देश म्हणून वाटचाल करायची, ते आपणच ठरवायचे आहे. हे करत असताना भ्रष्टाचार म्हणजे नेमके काय? याबाबत….
Reviews
There are no reviews yet.