झोत

135.00

1 in stock

पुस्तकाचे नाव झोत
लेखक रावसाहेब कसबे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १३२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ९५ ग्रॅम

Description

‘झोत’ प्रसिद्ध होऊन आता जवळजवळ पंचवीस वर्षे लोटली आहेत. या पंचवीस वर्षांच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. १९७८ साली ‘झोत’ पहिल्यांदा प्रसिद्ध झाले, त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा त्याची विचारसरणी स्वीकारलेल्या राजकीय पक्षाच्या आणि व्यक्तींच्या हातात भारताची राजकीय सत्ता यावी यासाठी कार्यरत असलेला एक ‘राजकीय दबावगट’ म्हणून कार्यरत होता. हा राजकीय दबावगट (Political Pressure Group) हिंदुत्ववादी विचारांशी बांधिलकी मानणारा आणि स्वतःच्या मर्यादित परंतु संघटित शक्तीच्या जोरावर त्या विचारांना वास्तवात उतरविण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या निष्ठावंत आणि क्रियाशील स्वयंसेवकांचा एक संच होता. जो हिंदुत्ववाद संघ स्वयंसेवकांना अभिप्रेत होता, त्याची वैचारिक मांडणी संघाचे दुसरे सरसंघचालक मा. स. गोळवलकर गुरुजी यांनी त्यांच्या १९६६ साली प्रसिद्ध केलेल्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या ग्रंथात केलेली होती. आपल्या देशात आणीबाणीनंतर उजव्या राजकीय शक्ती क्रमाने संघटित आणि सशक्त बनत गेल्याने आणि १९७७ च्या आसपास स्थापन झालेल्या जनता पक्षात त्या सामील झाल्याने त्यांना बळ पुरविणे हे संघाचे एक प्रमुख उद्दिष्ट होते. त्यामुळे या विचारसरणीच्या व्यक्ती आणि राजकीय पक्ष सत्तेवर आले तर ते कोणती ध्येयधोरणे त्यांच्या विचारप्रणालीप्रमाणे राबवू शकतील याची चर्चा त्यावेळी सुरू होणे साहजिक होते. या चर्चेचाच एक भाग म्हणून ‘झोत’चे लिखाण झाले. मी त्यावेळी ती सारी चर्चा गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ किंवा ‘विचारधन’ यापुरतीच मर्यादित ठेवली होती. त्यात गुरुजींच्या हिंदुत्ववादाचे स्वरूप नेमके काय आहे हे त्यांच्याच ग्रंथाच्या आधारे स्पष्ट करणे एवढाच मर्यादित उद्देश होता. म्हणून ‘झोत’ ही एका अर्थाने गुरुजींच्या ‘विचारधना’ ची समीक्षा होती. ती जशी अनेकांना आवडली तशी अनेकांच्या कठोर टीकेचाही विषय बनली. त्या निमित्ताने ज्या स्वयंसेवकांनी ‘विचारधन’ वाचले नव्हते त्यांना ते वाचण्याची प्रेरणा मिळाली. तशा आशयाची अनेक पत्रे वाचून मीही सुखावलो. कारण संघ स्वयंसेवकांसहित सर्वांनीच गुरुजींचे ‘विचारधन’ चिकित्सकपणे वाचावे आणि त्यासंबंधी स्वत:चे मत बनवावे अशीच माझी इच्छा होती.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “झोत”

Your email address will not be published. Required fields are marked *