Description
ऐन विशी-बावीशीत तुकाराम महाराजांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आणि अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी तुकाराम महाराज गेले. अवघ्या वीस-बावीस वर्षात तुकाराम महाराजांनी जे कार्य केलं त्यामुळे ते कायमचे अजरामर झाले आहेत. तुकाराम महाराज हे ‘बोले तैसा चाले’ या कोटीचे महापुरुष होते. म्हणूनच त्यांच्या शब्दांना आजही वजन आहे. चारशे वर्षे झालीत तरी तुकाराम महाराजांच्या शब्दांची जादू आजही कमी झाली नाही.
चारशे वर्षांत जीवनाच्या सर्व क्षेत्रांत जमीन-अस्मानाचा बदल झाला आहे पण बदलली नाही ती तुकाराम महाराजांची जनमानसावरची मोहिनी ! ती जशी काल होती तशीच ती आजही आहे आणि तशीच उद्याही राहणार आहे. कोणत्याही काळी, आणि जगातल्या कोणत्याही स्थळी जगद्गुरु तुकाराम महाराज दिपस्तंभ बनून अवघ्या मानवतेला प्रकाश देत राहणार आहेत. आपणही या प्रकाशात सुस्नात होऊ या ! आपली जीवने उजळवू या! तुकाराम महाराजांचा वारसा अभिमानाने मिरवू या ! नव्या पिढीपर्यंत पोहचवू या !
– उल्हास कृष्णराव पाटील
Reviews
There are no reviews yet.