Description
एकत्र बसून समाजव्यवस्थेतलं तण काढू या !
संत तुकारामांनी व्यक्तिगत जीवनाच्या शुद्धीकरणासाठी एक अतिशय उदात्त विचार मांडला आहे. एका अभंगात ते म्हणतात, ” बैसोनि निवांत । शुद्ध करी चित्त । तया सुखा अंतपार नाही ।।” आपल्यापैकी प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनाला तर हे सूत्र मार्गदर्शक आहेच; आपण अंतर्मुख होऊन, आत्मनिरीक्षण करून आपल्या आत असलेल्या एकेका दोषांचं उच्चाटन केलं असता, आपल्या जीवनाचं शुद्धीकरण होतं, हे खरंच आहे. परंतु आज संत तुकारामांचा हा उपदेश आपल्या सामाजिक जीवनालाही लागू करण्याची गरज आहे. आपण एकत्र बसू या. आपल्या समाजव्यवस्थेत कोणकोणतं तण आहे ते पाहून शांतपणानं ते उपटून टाकू या, समाजव्यवस्थेतील एक – एक दोष दूर करू या आणि या व्यवस्थेला शुद्ध बनवू या, विशुद्ध बनवू या.
Reviews
There are no reviews yet.