Description
दलित-बहुजन, सामाजिक-आध्यात्मिक आणि वैज्ञानिक क्रांतीवरील चिंतन
जातीय राजकारणावर विखारी हल्ले चढवत हिंदुत्वाच्या चष्म्यातून मांडलेल्या ऐतिहासिक घटनांना हे पुस्तक आव्हान देते. तसेच रास्ट्रहितासाठी देशातील वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेकडेही पुन्हा नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन हे पुस्तक देतं. दलित – बहुजन समाजातील अप्रकट वैज्ञानिक व उत्पादनशील क्षमतांना दाबून ठेवणारा ” बुरसटलेला धर्म ” म्हणून हिंदुत्वाची वेगळीच ओळख करून देतं.
लेखकाच्या मते आध्यात्मिक अतिरेकाची ही दडपशाही धर्म आणि राष्ट्र – राज्यांच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. आध्यात्मिक न्याय किंवा वर्णधर्म या जातीव्यवस्थेचं समर्थन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संकल्पना आध्यात्मिक विषमतेने भारल्याची टीका ते करतात.
सूक्ष्म परीक्षण केल्यास हे पुस्तक आंध्र प्रदेशच्या दलित – बहुजन समाजातील उत्पादनशील ज्ञान यंत्रणेच्या अभ्यासावर आधारित आहे आणि या समाजातील सदस्यांच्या आयुष्यातील कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या घटना व शास्त्रीय – तांत्रिक प्रगतीचं दैनंदिन परीक्षणही हे पुस्तक पुरवतं. अर्थाच्या विस्तारित कक्षेत पाहिलं तर हे पुस्तक जगातील इतर धर्मांना विश्वास आणि कारणभाव यांच्यात समतोल घडवून आणणं जमलं असताना तेच करण्यात हिंदू धर्म कसा अयशस्वी ठरला हे दाखवून देतं.
कांचा अइलैय्या हे समाजात वर्चस्व असणाऱ्या ज्ञातींच्या बौद्धिक कल्पनाविलासावर टीका करत प्रवाहातून बाहेर ठेवलेल्यांना प्रेऱणा देतात. हे करतानाच ते असंख्य सामाजिक – राजकीय गोष्टींमधील नाना कळा खुबीने समजावून सांगतात, ज्या विद्वान तसेच समकालीन भारतातील राज्यपद्धती व समाजरचनेविषयी आस्था असणाऱ्यांना आकर्षित करून घेतात.
Reviews
There are no reviews yet.