डॉ. भारत पाटणकर
गेली ३२ वर्षे वर्गीय जातीय आणि लैंगिक शोषण संपवण्याच्या ध्येयाने चळवळीत पुर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कार्य. महाराष्ट्रातील राबणाऱ्या जनतेचे लढाऊ नेतृत्व. समान पाणी वाटप, दुष्काळ निर्मूलन, विद्रोही सांस्कृतीक चळवळ, हिंदी है हम…. हिंदोस्ताँ हमारा परिषद, मुस्लीम विकास आयोग वगैरे चळवळींचे वैचारीक सामाजीक नेतृत्व, विद्यार्थी गिरणी कामगार, शेतकऱ्यांच्या लढ्यांचे नेतृत्व करणारे बहुआयामी व्यक्तीमत्व, श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख पुढारी कार्यकर्ते. गेली ३२ वर्षे अखंडपणे चववळीत कार्यरत. निस्पृह, आग्रही, बिनतोड लढाऊ नेतृत्व म्हणून ख्याती. मार्क्सवाद, फुले आंबेडकरवादी विचारपद्धतीने जातीव्यवस्था स्त्रियांची गुलामगिरी, आदिवासी संस्कृती, कष्टकऱ्यांचे शोषण याबद्दल मुलभूत वैचारिक मांडणी करणारे विविध भाषेतील विपूल लेखन.
Reviews
There are no reviews yet.