गांधी आणि आंबेडकर दोन नेतृत्वांचा अभ्यास

55.00

1 in stock

पुस्तकाचे नाव गांधी आणि आंबेडकर दोन नेतृत्वांचा अभ्यास
लेखक एलिनॉर झेलियट
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५० ग्रॅम

Description

मोहनदास करमचंद गांधी आणि भीमराव रामजी आंबेडकर हे दोघेही वेगवेगळ्या गटांसाठी अस्पृश्यांचे त्राते ठरत होते. गांधी सवर्ण हिंदू होते, ‘राष्ट्रपिता’ म्हणून ते ओळखले जातात आणि त्यांनी इतर कुठल्याही विषयापेक्षा अस्पृश्यतेवर सर्वाधिक लिखाण केलं वा बोलणं केलं.  भारताच्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी हिंदू – मुस्लिम एकते एवढचं अस्पृश्यांसाठी हरिजन हे संबोधनही त्यांनी लोकप्रिय केलं. आंबेडकर हे भारतातील सर्वात उच्चशिक्षित अस्पृश्य होते, अस्पृश्यांसाठीच्या राजकीय पक्षाचे संस्थापक होते आणि शिवाय अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी स्थापन झालेल्या अनेक संस्था, शाळा व महाविद्यालयांमागे त्यांची प्रेरणा होती.  जिच्या माध्यमातून तीस लाखांहून अधिक अस्पृश्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला ती धर्मांतर चळवळ उभारणं हे आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस केलेल्या मुख्य कामांपैकी एक होतं.  आंबेडकरांच्या महानिर्वाणानंतरच्या दुसऱ्याच दिवशी नेहरूंनी त्यांचं वर्णन ‘ हिंदू समाजातल्या सगळ्या शोषक शक्तींच्या विरोधातल्या उठावाचं प्रतीक’ अशा शब्दांत केलं.

दोघांनाही सामान चिंता लागून राहिलेली असूनही आंबेडकर आणि गांधी अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यक्रमासंदर्भात कायमच एकमेकांविरोधात उभे राहिलेले दिसतात. ब्रिटिशांच्या राज्यात अस्पृश्यांसाठी राजकीय सवलत मिळवण्यासाठी आंबेडकरांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना गांधींनी १९३२ साली खीळ घातली. ही सवलत अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचा आंबेडकरांना विश्वास होता.  त्यामुळं अस्पृश्यता ही धार्मिक गरज मानणाऱ्या सनातनी हिंदूंवर केलेल्या टीकेपेक्षाही कठोर शब्दांत आंबेडकरांनी गांधींवर टीका केली. या दोन नेत्यांमधील संघर्ष त्यांच्या विचारधारांमधील विरोधाच्या संदर्भात आणि भारताची सर्वात मोठी सामाजिक समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे उपाय पुढे करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांच्या संदर्भात तपासण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गांधी आणि आंबेडकर दोन नेतृत्वांचा अभ्यास”

Your email address will not be published. Required fields are marked *