Description
* भांडवलशाही नफ्याच्या मागे लागते व कामगारांचे रक्तशोषण करून गलेल बनते. भांडवलशाहीला मारावयाला निघालेले मार्क्सवादी लोक म्हणतात, मार्क्सवादाप्रमाणे फक्त दोनच वर्ग अस्तित्वात आहेत. एक मालक व दुसरा मजूर. तेव्हा मालकांची भांडवलशाही नष्ट करण्यास मजुरांनी एक व्हावे. पण ते तत्त्वज्ञान सर्वस्वी खरे नव्हे । माक्र्सने फक्त दोनच वर्गाचे अस्तित्व मान्य केले. हे बरोबर नाही. गेल्या महायुद्धात जर्मनीतील कामगार रशिया, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका या देशांतील कामगारांच्या बरोबर लढले ना? हिंदुस्थानातील कामगार जातीजातीत लढतात. त्यांची एकी होऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर नीच जातीच्या कामगाराला उच्च जातीचा कामगार आपल्या जवळही बसू देत नाही.
Reviews
There are no reviews yet.