डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर : चरित्र खंड – 2

378.00

1 in stock

पुस्तकाचे नाव डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर : चरित्र खंड – 2
लेखक चांगदेव भवानराव खैरमोडे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३४४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३६९ ग्रॅम

Description

• अस्पृश्यांच्या चळवळीचे केंद्र- मुंबई आणि मुंबईतील पहिले केंद्र भायखळा- कामाठीपुरा इकडचा भाग. अस्पृश्यांच्या मुंबईत ज्या सभा होत त्यांपैकी ७५ टक्के सभा याच भागात होत असत. त्या भागातील रहिवाशांत भंडारे व जत्रा फार होत व त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च होत असे. वारकरी, संत, महंत आणि पोतराज यांची या वेळी समाजात चंगळ होत असे. शिक्षणाची आवड उत्पन्न झाल्यानंतर हे भंडारे व जत्रा कमी होऊ लागल्या व समाजातील पैशाचा व्यय सभा, लायब्रऱ्या, रात्रीच्या शाळा यांसाठी होऊ लागला. समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी तनमनधन खर्चून झटावे, अशी भावना समाजात फैलावत चालली व त्यामुळे चळवळीला व्यापक व विधायक स्वरूप येत गेले.

• “आम्हा महार लोकांना पूर्वकालीन बादशहांकडून ‘हाडको हाडवळा’ नामक इनामदारी मिळून बावन हक्क प्राप्त झाले होते. हे बादशहांनी दिले काय आणि इंग्रज सरकारने दिले काय, दोन्ही सारखेच. अशा प्रकारचे लेख आपणाजवळ असल्याचे एक-दोन गावच्या महार लोकांनी सांगितले आहे. पण कोठे कोठे हाडकी नावाची जमीन नाहीशी झाली आहे, त्या ठिकाणी ‘सोळाबत्तीस’ महारांचा तरणोपाय नाहीसा होऊन आम्हास पोट बांधून काम करावे लागते. गावखेड्यांत असे इनामदार बरेच निघतील. आम्ही सरकारी कामे करतो व त्याबद्दल आम्हास सरकारातून पगारही मिळतो. पण तो वर्षातून एकच वेळ असून कोठे पाच रुपये, कोठे दहा रुपये व कोठे तर अजिबात मिळतच नाही. कुळकर्ण्यास ५० पासून ७५ रुपये व पाटलास शे-पाऊणशे पगार मिळतो, पण महारांना तसे काही मिळत नाही. तेव्हा पोटे तरी कशी भरावी? या निकृष्टावस्थेची आमची दाद सरकारशिवाय कोण घेणार?

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर : चरित्र खंड – 2”

Your email address will not be published. Required fields are marked *