Description
- घटना तयार करण्यात बाबासाहेबांचा फार मोठा वाटा होता. या संबंधात काही टीकाकार असे म्हणतात की, इतर लोकांनीही घटना तयार करण्यात भाग घेतला होता. या लोकांना उत्तर देऊन त्यांचे म्हणणे खोडून काढणे कठीण नाही. घटनेची कलमे तयार करताना बाबासाहेबांनी जे परिश्रम केले त्याला तोड नाही. ते रात्री २-३ वाजेपर्यंत दररोज जागरण करीत असत आणि प्रत्येक कलमाची भाषा सोपी पण कायदेशीर व्हावी म्हणून प्रत्येक कलमासाठी ते आलटून पालटून खर्डा तयार करीत असत. त्या वेळी त्यांच्या गुडघ्याचा आजार बळावला होता. ते संदर्भ ग्रंथांचा भारा आपपासच्या टेबलांवर ठेवीत असत व लंगडत जाऊन संदर्भ ग्रंथ शोधून काढीत असत. वादग्रस्त घटनानिर्मितीचे जास्त श्रेय कोणाला द्यावे, या बाबतीत मायकेल ब्रेचर यांनी Nehru: A Political Biography, 1959, या आपल्या ग्रंथात वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती देऊन असे दाखविले आहे की, सर बेनेगल राज (Constitutional Advisor to the Constituent Assembly. एस. एन. मुकर्जी, (Chief Draftsman.), आणि एच. व्ही. आर. अय्यंगार ( Secretary of the Assembly) यांनी घटनेची तांत्रिक बाजू जरी सांभाळली होती तरी घटनेत जीव निर्माण करण्याचे प्रमुख कार्य आंबेडकर यांनीच केले.
Reviews
There are no reviews yet.